मुंबई महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘असाही’ गरीब आजीला मदतीचा हात

250

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आपल्या दोन्ही नातवंडाच्या शिक्षणाचा भार टोपल्या विणून उचलणाऱ्या एका टोपल्या विणकर आजीच्या टोपल्याच खरेदी करत एकप्रकारे त्यांना मदतीचा हात महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिला. आपली नातवंडे ज्या महापालिका शाळेत शिकतात, त्या महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख हे आपली विचारपूस करायला आणि सर्वच टोपल्या विकत घेऊन दाखवलेली माणुसकी पाहून त्या माऊलीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले.

माऊलीच्या टोपली विणणाऱ्या हाताकडे ते न्याहाळत बसले

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी राजु तडवी हे शनिवारी वरळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ट्रस्ट बुद्धविहार येथे  आयोजित केलेल्या आदर्श शिक्षकांच्या  सन्मान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. याठिकाणचा कार्यक्रम आटोपून ते घरी निघत असताना रस्त्याच्या कडेला टोपली विणणारी आजी दिसली. या एवढ्या वयातही मेहनत करणाऱ्या आजीची काम करण्याची वृत्ती पाहून क्षणभर तडवी यांची पावले तिथे थांबली आणि काही मिनिटे कोणताही संवाद न करता त्या माऊलीच्या टोपली विणणाऱ्या हाताकडे ते न्याहाळत बसले.

(हेही वाचा शी जिनपिंग नजरकैदीत, चीनमध्ये घडणार सत्तांतर?)

सर्व टोपल्या खरेदी केल्या

या वयातही त्या काम करत असल्याने तडवी यांना राहवले नाही अणि त्यांनी त्यांच्या कुटुंबीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजीने, माझा मुलगा आणि सून दोघेही मृत्यू पावले असल्याचे दु:खी अंतकरणाने सांगितले. आता दोन नातवंडे आहेत. मोठी मुलगी इयत्ता ७ वीत शिकत आहे, तर मुलगा इयत्ता पहिलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत. या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी या टोपल्या विणून त्याची विक्री करण्याचे काम करत असल्याचे आजीने, तडवी यांना सांगितले. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनाही राहवले नाही आणि त्यांनी आजीला, टोपलीची किंमत विचारली, यावर त्यांनी ४० रुपये एवढी किंमत सांगितली. परंतु आजीची या वयातही मेहनत करण्याची ही जिज्ञासा पाहून तडवी यांनी या सर्व टोपल्या ५० रुपये दराने खरेदी केल्या. या सर्व टोपल्या खरेदी केल्यानंतर त्या माऊलीच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि  डोळ्यातून आनंदाश्रू तरळू लागले. याबाबत बोलतांना शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी आवाहन करताना, या जगात अनेक असे गोरगरीब लोक आहेत. अशाप्रकारे गरीब लोक दिवले की त्यांना अशाप्रकारे मदत करत जावा. अशाप्रकारे त्यांना मदत करून त्यांना मदतीचा हात देऊ शकतो. अशा अनेक आजींना आपण मदत करून शकतो, प्रत्येकाने अशाप्रकारे मदत करत जावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.