आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस दलात (Mumbai Police Force) बदल्यांचे वारे सुरू आहेत. मुंबई बाहेरून मुंबईत बदली होऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पोस्टिंगला घेऊन मोठी चढाओढ सुरू असताना दिसून येत आहे. मुंबईत चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून बदली होऊन आलेले अधिकारी आणि अंतर्गत बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. या चढाओढीत मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला सर्वाधिक महत्व प्राप्त झाले असून एकेकाळी मुंबई पोलीस दलाचा (Mumbai Police Force) कणा समजल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेचे महत्व कमी झाले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. (Mumbai Police Force)
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सरकारी अधिकाऱ्याच्या बदल्यांचे मागील काही आठवड्यापासून सत्र सुरू आहे. या बदल्यामध्ये पोलीस दलात (Mumbai Police Force) देखील मोठे फेर बदल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कालावधी पूर्ण झालेले, तसेच अनेक वर्षे एकाच जिल्ह्यात असलेल्या आयपीएस अधिकारी पासून पोलीस निरीक्षकाच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आहे. मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातील अधिकारी बदलून आलेले आहेत. बाहेरून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये मुंबईत चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी म्हणून अनेकजण मुंबईत येण्यापूर्वीच वशिला लावून आले आहे तर अनेकजण मुंबईतच ओळखीच्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहे. (Mumbai Police Force)
मुंबई पोलीस दलाकडून (Mumbai Police Force) मागील आठवड्यापासून अंतर्गत बदल्या सुरू केलेल्या असून बाहेरून आलेले अधिकारी तसेच मुंबईतील अधिकाऱ्यांकडून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेला पसंती दाखवली असून दुसऱ्या क्रमांकावर पोलीस ठाणे असून तिसऱ्या क्रमांकावर मुंबई गुन्हे शाखा आहे. मुंबई पोलीस दलातील (Mumbai Police Force) आर्थिक गुन्हे विभागाचे मागील काही वर्षांपासून महत्व वाढले आहे. मोठे घोटाळे, फसवणूक, बँक घोटाळा, बांधकाम विकासकाकडून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचे फसवणूक या सारखे मोठे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल होत असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेला सर्वाधिक महत्व आले आहे. पोलीस अधिकारी यांची दुसरी पसंती मुंबईतील पोलीस ठाण्यांना आहे, त्यातही पश्चिम आणि उत्तर मुंबईतील पोलीस ठाणे यांना सर्वाधिक पसंती आहे. मुंबई गुन्हे शाखेकडे सध्याच्या घडीला कुठलाही अधिकारी जाण्यास इच्छूक नाही, एकेकाळी या गुन्हे शाखेत पोस्टिंग मिळावी म्हणून अनेकांची धडपड असायची, मात्र यावेळी गुन्हे शाखेकडे जाण्याचा अधिकारी यांचा कल खूप कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. (Mumbai Police Force)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community