नुकताच राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार, राज्यात 36 टक्के कुटुंबे ही कर्जबाजारी आहेत. कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, त्यामुळे झालेली वेतन कपात, तसेच औषधोपचार आणि स्वच्छता यांसाठी अधिकचा खर्च वाढल्याने ही कुटुंबे कर्जबाजारी झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
…म्हणून एवढी कुटुंबे कर्जबाजारी
16 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करुन हा निष्कर्ष काढण्यात आला. टाळेबंदीमुळे बंद असलेली मजूरी, शेतमालाला पुरेसा भाव नाही, वेतनकपात, ठप्प पडलेले उद्योगधंदे या सर्व बाबींमुळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे राज्यातील जवळपास 36 टक्के कुटुंबावर कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील 6 हजार 200, तर शहरी भागातील 9 हजार 800 कुटुंब सहभागी झाले होते.
या कारणांनी खर्च वाढला
- शेतीसाठी आवश्यक संसाधनांचे भाव वाढल्याचे 53.2 टक्के शेतकरी कुटुंबीयांनी सांगितले.
- स्वच्छतेसाठी (सॅनिटायझर, साबण, हॅण्डवॉश) आवश्यक साधनांची खरेदी वाढली.
- घरखर्चात वाढ झाली. वैद्यकीय खर्चातही वाढ.
( हेही वाचा:संसदेचं कामकाज सर्वसामान्यांना समजावं म्हणून घेण्यात आला ‘हा’ निर्णय! )