आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच मार्च. बॅंकांपासून अनेक संस्थांमध्ये मार्चमध्ये क्लोजिंगची काम सुरू असतात त्यामुळे हा महत्त्वाचा महिना समजला जातो. सरकारने अनेक गोष्टी अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच करबचतीसाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. या कालावधीत ही कामे केले नाहीतर नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो.
( हेही वाचा : उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा! पहा व्हायरल व्हिडिओ)
‘ही’ पाच कामे वेळीच पूर्ण करा
पॅन-आधार लिंक
तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा. तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत हे काम न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेकडून ३० जून २०२२ नंतर पॅन आधारशी केल्यास १ हजार रुपये विलंब शुल्क आकारला जात आहे.
गुंतवणूक करण्याची संधी
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अद्याप गुंतवणूक केली नसेल तर लवकर हे काम पूर्ण करा. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, ५ वर्षांची FD, ELSS इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम 80C कर सूट मिळवू शकता. यासाठी ३१ मार्चपर्यंत या योजनेमध्ये गुंतवणूक करावी.
पीएम वय वंदना
जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असले तर ते ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकतात. ही योजना पुन्हा सुरू राहणार की नाही, यासंदर्भात सरकारने अधिसूचना काढलेली नाही त्यामुळे ३१ मार्चपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही ६० वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.
अमृत कलश
स्टेट बॅंक ऑफ इंडियाची नवीन मुदत ठेव योजना म्हणजेच अमृत कलश योजना या महिन्यामध्ये संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के तर इतरांना ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.
म्युच्युअल फंडात नॉमिनेशन
तुम्ही म्युच्युअल फंड नॉमिनेशन प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.
Join Our WhatsApp Community