- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम येथील फेरीवाल्यांवर (Hawkers) सध्या कारवाई तुर्तास थांबली असली तरी या कारवाई दरम्यानही डिसिल्व्हा मार्गावरील फेरीचा व्यवसाय तेजीत दिसून येत होता. पोलिस तसेच महापालिकेच्या पथकाकडून डिसिल्व्हा रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाईला झुकते माप दिले जात असल्याचे वारंवार दिसून येत होते. परंतु कोणे एकेकाळी ही डिसिल्व्हा गल्ली भाजी आणि फळ विक्रेत्यांची गल्ली म्हणून ओळखली जात होती. परंतु आज भाजी विक्रीचा व्यवसायच दिसून येत नसून दरबार हॉटेल परिसरातील फळ विक्रेते वगळता ही गल्ली आता कपडे विक्रेते आणि कटलरी सामान विक्रेत्यांची गल्ली म्हणून ओळखली जात आहे.
(हेही वाचा – कुणबीच्या तीन पोटजातींचा ओबीसीत समावेश; आचारसंहितेपूर्वीच Cabinet चा निर्णयांचा धडाका)
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या समोरील डिसिल्व्हा गल्लीत काही वर्षांपूर्वी १८ ते २० महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करायच्या. तर विसावा हॉटेलच्या आसपास १४ ते १५ मराठी फळ विक्रेते असायचे. तर दरबार हॉटेल परिसरात काही उत्तर भारतीय फळ विक्रेते असायचे. परंतु हे सर्व फेरीवाले मोठ्या प्रशस्त जागे पाट्या ठेऊन व्यवसाय करायचे. तब्बल १२ ते १५ फुट लांबीच्या जागेत एकेक फेरीवाल्यांचा (Hawkers) व्यवसाय असे. परंतु आता विसावा हॉटेल परिसरातील मराठी फेरीवाले आता कुठेच दिसून येत नसून मराठी भाजीवाल्या महिलाही आता गायब झाल्या. परंतु दरबार हॉटेल परिसरातील उत्तर भारतीयांचा फळांचा व्यवसाय कायम आहे. मात्र, यासर्वांच्या ऐकका जागांवर आता चार ते पाच फेरीवाले व्यवसाय करू लागले असून यामुळे या गल्लीतील फेरीवाल्यांची संख्या मोठ्याप्रमाणात प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.
(हेही वाचा – Muslim : डोंबिवलीत अली खान फळे विकताना पिशवीतच करायचा लघुशंका, तिच पिशवी तो फळांवर ठेवायचा)
स्थानिक जुन्या रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दरबार हॉटेल परिसरातील उत्तर भारतीय फळ विक्रेत्यांशिवाय या डिसिल्व्हा गल्लीत इतर भाषिक फेरीवाले दिसत नव्हते. ही संपूर्ण गल्ली मराठी माणसांचीच होती. परंतु आता या गल्लीत मराठी फेरीवाला औषधालाही सापडत नाही. विशेष म्हणजे या गल्लीत आता सर्वच फेरीवाले (Hawkers) भाडोत्री असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. जिथे या गल्लीची ओळख भाजी आणि फळ विक्रेत्यांची गल्ली अशी होती. परंतु आता य गल्लीत एकमेव भाजी विक्रेते असून बाकी सर्व कपडे व कटलरी विक्रेत्यांची गल्ली अशीची याची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे मराठी फेरीवाल्यांकडूनच भाड्याने जागा दिल्या जात असल्याने याठिकाणी फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community