इको फ्रेंडली गणेशमूर्ती शोधणे झाले सोपे; प्रदूषण मंडळाने आणले ‘Eco Bappa’ ॲप

Eco Bappa

189
इको फ्रेंडली गणेशमूर्ती शोधणे झाले सोपे; प्रदूषण मंडळाने आणले 'Eco Bappa' ॲप
इको फ्रेंडली गणेशमूर्ती शोधणे झाले सोपे; प्रदूषण मंडळाने आणले 'Eco Bappa' ॲप

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांची माहिती देण्यासाठी “इको बाप्पा” (Eco Bappa App) नावाचे ॲप तयार केले आहे. चिकणमाती, कागदाचा लगदा, हळद, नारळ, कच्ची केळी, सुपारी आदींपासून गणेशमूर्ती घडवल्या जातात. राज्यातील अशा मूर्तीकारांचे एक सादरीकरण एमपीसीबीने घेतले. त्यानंतर “इको बाप्पा” ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये प्रामुख्याने शाडू मातीपासून, तसेच इतर साहित्यापासून गणेशमूर्ती घडवणाऱ्या राज्यातील सुमारे २५० ते ३०० मूर्तीकारांनी नोंदणी केली आहे.

(हेही वाचा – Nandurbar Accident: गुजरातहून नंदुरबारला जाताना थार दरीत कोसळली आणि…)

इको ॲपवर ग्राहकाने फोनवर वा ई-मेलवर मूर्तीकाराला शोधल्यास आपल्या परिसरात कोणते मूर्तीकार आहेत, त्याची माहिती मिळते. या ॲपमध्ये मूर्तिकाराचा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल अॅड्रेस, त्याने तयार केलेल्या गणेशमूर्तीचे छायाचित्र दिसणार आहे. इच्छुकांनी ॲपवर जाऊन मागणी नोंदवायची आहे. गणेशमूर्तीच्या (Ganesh Chaturthi 2024) किमतीत चढ-उतार होत असल्याने ॲपवर किंमत देण्यास मूर्तीकारांनी नकार दिला आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ ही फक्त नियामक संस्था आहे. अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनाच करायची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वेळ मिळताच पुढील आठवड्यात ॲपचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात आहेत १६०० मूर्तीशाळा

एका रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात गणेशमूर्ती बनवण्याच्या मूर्तीशाळा मोठ्या प्रमाणात आहेत. येथील गावांत वर्षभर घराघरांत ६ इंच ते १२ फूट उंचीच्या मूर्ती तयार करण्याचे काम चालते. या भागात असे १६०० उद्योग आहेत. त्यांचा वार्षिक व्यवसाय २५० ते ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तेथे दरवर्षी ३ ते ३.२५ कोटी मूर्ती तयार होतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.