CM Yogi Adityanath यांचा मांसाहार करतानाचा बनावट व्हिडिओ पोस्ट; फिरोज खानविरुद्ध एफआयआर दाखल

45
CM Yogi Adityanath यांचा मांसाहार करतानाचा बनावट व्हिडिओ पोस्ट; फिरोज खानविरुद्ध एफआयआर दाखल
CM Yogi Adityanath यांचा मांसाहार करतानाचा बनावट व्हिडिओ पोस्ट; फिरोज खानविरुद्ध एफआयआर दाखल

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबादमध्ये (Moradabad) फिरोज खान (Feroz Khan) नावाच्या धर्मांधांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath ) यांच्या फोटोशी छेडछाड करत त्यांना मांसाहार खाताना दाखवले आहे. यानंतर आरोपीने याच छायाचित्राची एक व्हिडिओ तयार करत त्यावर अश्लील टिप्पणी केली आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर तो व्हिडिओ पोस्ट केला. मात्र या व्हिडिओवर लोकांना संताप व्यक्त केला. तक्रारीनंतर मुरादाबाद सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपी फिरोज खानविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

( हेही वाचा : MSRTC च्या १४० जाहिरातींच्या जागा परस्पर केल्या हडप

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या (BJYM) कार्यकर्त्याने सांगितले की, योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. तर ते गोरखपीठाचे प्रमुख आणि एक धर्मिक संत आहेत. तसेच सनातन धर्माचे आचार्य देखील आहेत. त्याचा अपमान सहन केला जाणार नाही. जर २४ तासांत आरोपींना अटक केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा ही भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला. (CM Yogi Adityanath)

भाजयुमोचे (BJYM) मुरादाबाद (Moradabad) शहर अध्यक्ष म्हणाले की, स्टेटस पाहिल्यानंतर त्यांनी फिरोज खान (Feroz Khan) याला फोन केला आणि व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितले. परंतु त्याने असे करण्यास स्पष्टपणे नकार दिला. तो म्हणाला की, तुम्हाला जे करायचे ते करा, पोलिसांकडे तक्रार करा, मला काहीही फरक पडत नाही, असे खान (Feroz Khan) म्हणाला. त्यामुळेच तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएसच्या (BNS) कलम १९६, २९९, ३५२ आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) कायद्याच्या कलम ६६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणाचा सखोल तपासही सुरु आहे. (CM Yogi Adityanath)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.