हिंदूद्वेषी सपा खासदार Afzal Ansari यांच्यावर गुन्हा दाखल; म्हणाले, महाकुंभात पाप धुतले गेले तर…

96
हिंदूद्वेषी सपा खासदार Afzal Ansari यांच्यावर गुन्हा दाखल; म्हणाले, महाकुंभात पाप धुतले गेले तर...
हिंदूद्वेषी सपा खासदार Afzal Ansari यांच्यावर गुन्हा दाखल; म्हणाले, महाकुंभात पाप धुतले गेले तर...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल गाझीपूर (Ghazipur) येथील समाजवादी पक्षाचे खासदार अफजल अन्सारी (Afzal Ansari) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्सारी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री गाझीपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष देव प्रकाश सिंह (Dev Prakash Singh) यांनी शादियाबाद पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याचिकाकर्ता देव प्रकाश सिंह (Dev Prakash Singh) यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, मी बिरनो पोलीस स्टेशन परिसरातील बुद्धपूर गावचे रहिवासी आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ क्लिपद्वारे त्यांना याप्रकरणाची माहिती मिळाली. प्रत्यक्षात, १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास, शादियाबाद चौकात संत शिरोमणी गुरु रविदासजी (saint shiromani guru ravidasji) यांची जयंती साजरी केली जात होती. यामध्ये अनेक मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

( हेही वाचा : New India Co-operative Bank च्या ग्राहकांना किरीट सोमय्या यांनी दिला महत्त्वाचा संदेश

देव प्रकाश सिंह पुढे म्हणाले की, गाझीपूरचे सपाचे खासदार अफजल अन्सारी हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाकुंभावर अश्लील टिप्पणी केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, खासदाराने केलेल्या या टिप्पणीमुळे सनातन हिंदू (Hindu) धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, जे त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध होते.

तक्रारीत म्हटले आहे की, अफजल अन्सारी म्हणाले, “श्रद्धेच्या या महाकुंभात स्नान करून लोकांना वाटते की, ते पवित्र होतील. त्यांचे पाप धुतले जातील. जर आपले पाप धुतले गेले तर वैकुंठापर्यंत सणात, संगम तीरावर स्नान केल्याने व्यक्ती पवित्र होते असे मानले जाते. पाप धुऊन जाईल. जर पापे धुतली गेली तर वैकुंठापर्यंत जाण्याचा रस्ता मोकळा होतो. त्यामुळे असे दिसते की, नरकात कोणीही वाचणार नाही. त्यामुळे नरकात कोणीही थांबणार नाही आणि वैकुंठातील जागा हाऊसफुल होईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

देव प्रकाश सिंह यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, खासदार अफजल अन्सारी यांनी यापूर्वीही हिंदू (Hindu) धर्मातील संत आणि ऋषींविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. तक्रारीच्या आधारे, शादियाबाद पोलिस ठाण्याने अफजल अन्सारीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम २९९ आणि २५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

याआधीही त्यांनी कुंभमेळ्याला येणाऱ्या लोकांना नशेखोर असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. अफजल अन्सारी म्हणाले होते की, कुंभ मेळ्यात एखादी मालगाडी भरून गांजा पाठवला तर तिथे त्यांची विक्री होईल, असे वादग्रस्त विधान अन्सारी त्यांनी केले. (Afzal Ansari

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.