Fire : गोरेगाव फिल्म सिटीत पुन्हा आगीचा भडका; १४ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

162
Fire : फिल्म सिटीजवळील 'त्या' आगीमुळे गोरेगावमधील अनधिकृत बांधकामे ऐरणीवर

मुंबईसह उपनगरात मागील काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. परिणामी या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी (Financial loss) होत आहे. दरम्यान मुंबई उपनगरातील गोरेगांव येथील फिल्म सिटी (Goregaon Film city fire) येथे भीषण आग लागली आहे. ही आग फिल्मसिटीच्या (Filmcity) गेटजवळ असलेल्या संतोष नगर (Goregaon Santosh Nagar fire) भागात संध्याकाळी साडे सातच्या सुमारास आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १४ गाड्या संतोष नगर परिसरात पोहोचल्या. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत. (Fire )

फिल्मसिटीजवळ असलेल्या संतोष नगर परिसरात झोपडपट्टीत आग लागल्याची घटना घडली. घरांमध्ये असलेल्या सिलिंडरचे एकापाठोपाठ स्फोट होऊ लागल्यानं आग झपाट्यानं वाढत गेली. अनेक झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ‘अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व संबंधित यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. तसेव घटनास्थळी गरज लागल्यास एक रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे,’ अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला दिली. तसेच आग लागण्यामागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

(हेही वाचा – केंद्र सरकारच्या ‘Agristack’ या नव्या उपक्रमामुळे एका क्लिकवर मिळणार जमिनीच्या खरेदी-विक्रीची माहिती)

दरम्यान, मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ओशिवरा (Oshiwara) येथील फर्निचर मार्केटला (Furniture market) भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिम येथील रिलीफ रोडवर असलेल्या घास कंपाऊंडमध्ये सकाळी साडे ११ च्या सुमारास ही आग लागली होती.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.