ठाण्यातील (Thane) अंबरनाथ परिसरात असलेल्या एका फार्मा कंपनीला आज सकाळी भीषण आग (Thane Fire) लागली. या आगीत कारखान्याचा मोठा भाग जळून खाक झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ शहरातील आनंदनगर भागात एमआयडीसी (MIDC) असून या एमएसडीसीमध्ये (MSDC) रेसिनो ड्रग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी (Recino Drugs Private Limited Company) आहे. या कंपनीत विविध औषध तयार केली जातात.
(हेही वाचा-दोन वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळणार का? Ajit Pawar प्रीतिसंगमावर म्हणाले…)
या आगीत अनेक वाहनेही जळून खाक झाली. आग विझवत असताना स्फोटांचे आवाजही ऐकू आले, त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आग मोठी असल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Thane Fire)
(हेही वाचा-Maharashtra Election 2024: एकाच कुटुंबातील खासदार आणि आमदार; ‘या’ आहेत राज्यातील ५ जोड्या)
अद्याप आगीचे कारण समजू शकले नसून, तपास सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी हजर असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.(Thane Fire)
भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि एमआयडीसीच्या अग्निशनमन दलाच्या जवानांकडून अथक प्रयत्न करत अनेक बंब आणि पाण्याचे टँकर आणून या आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या या ठिकाणी कुलिंगचे काम सुरू आहे.(Thane Fire)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community