भिवंडीच्या (Bhiwandi) सरवली एमआयडीसीमधील (Saravali MIDC) सदाशिव हायजिन प्रायव्हेट लिमिटेड या डायपर बनवणाऱ्या कंपनीला ११ जूनला पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेत तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
(हेही वाचा – Railway line Tree Cutting : महापालिकेकडून करून घेतली झाडांची मोफत छाटणी, आता रेल्वे करणार कंत्राटदाराची नियुक्ती)
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire Brigade) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले; पण आग मोठ्या प्रमाणावर लागली असल्याने इमारतीचे तीन मजले जळून खाक झाले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रयत्नात आहे. मात्र आग शमवण्यासाठी आणखी काही वेळ जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाणी नसल्याने अडथळे
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा तीनच्या सुमारास इमारतीला आग लागली. सुरुवातीला पहिल्या मजल्याला आग लागली होती. त्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. कंपनीमध्ये कागद, कपडा, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भीषण आग लागली आहे. पाणी नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Bhiwandi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community