विले पार्ले येथील एलआयसी कार्यालयाला भीषण आग

मुंबई उपनगरातील विलेपार्ले पश्चिम येथे असणा-या एलआयसी कार्यालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत एल्आयसी कार्यालयाचा संपूर्ण मजला जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यावेळी सुदैवाने कार्यालयात कर्मचा-यांची संख्या कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे.

(हेही वाचाः गॅस दरांचा नवा उच्चांक, मुंबईतले दर वाचून होईल संतापाचा ‘भडका’)

शनिवारी सकाळच्या सुमारास आग

भारतीय आयुर्विमा महामंडळ(LIC)च्या विले पार्ले पश्चिम येथे असलेल्या शाखेच्या मजल्याने शनिवारा सकाळी अचानक पेट घेतला. यावेळी कार्यालयात जास्त कर्मचा-यांची उपस्थिती नसल्यामुळे फार मोठा अपघात टळल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, त्यांच्याकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार्यालयातील अत्यंत महत्वाची कागदपत्रे आगीने जळून खाक झाल्याचे समजत आहे.

(हेही वाचाः या बँकेच्या 600 शाखा बंद होणार, तुमचे अकाऊंट इथे आहे का?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here