Shivkashi येथे फटका उत्पादनाच्या कारखान्याला आग; ८ कामगारांचा मृत्यू

190

शिवकाशीजवळील (Shivkashi) सेंगामालापट्टी गावातील श्री सुदर्शन फायरवर्क्समध्ये ही घटना घडली. सारवणन यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 40 हून अधिक वर्किंग शेड आहेत. येथील वर्किंग शेडमध्ये कर्मचारी गुरुवारी दुपारी फॅन्सी फटाके तयार करत असताना घर्षण होऊन हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग जवळपासच्या शेडमध्ये पसरली. या आगीत ८ कामगारांचा मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

(हेही वाचा श्री तुळजाभवानी मंदिरातील 8.5 कोटींच्या दानपेटी घोटाळा प्रकरणी 16 दोषींवर गुन्हे नोंदवा; Bombay High Court चा आदेश)

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. जखमींना शिवकाशी (Shivkashi) सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक बचावकार्य चालविण्याचे आणि जखमींना योग्य उपचार मिळतील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्टॅलिन म्हणाले, आदर्श आचार संहिता लागू असल्याने निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन मृतांच्या कुटूंबीयांना सरकारी मदत प्रदान करण्यात येईल. शिवकाशी (Shivkashi)हे भारतातील फटाका उत्पादन केंद्र म्हणून ओळखले जाते. येथूनच फटाके, सेफ्टी मॅच आणि स्टेशनरी वस्तू तयार करून संपूर्ण देशभरात पाठवल्या जातात.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.