तारापूरमध्ये आग : टॅंकरसहित पाईपचा साठा जळून खाक! 

तारापूर अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

147

तारापूर एमआयडीसीतील एन झोनमधील प्लॉट नंबर 171 समोरील रस्त्यावर ज्वलनशील रसायनाने भरलेल्या एका टँकर व प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या एचडीपीई पाईपच्या साठ्याला गुरुवार, १३ मे रोजी, दुपारी दीडच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत टँकरसह पाईप जळाले. तारापूर अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

झेडएडी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराने नवापूरच्या जुन्या डीपीटी लाईनकरीता आणलेले हे हायडेन्सिटी पॉली इथिलिन (एचडीपीई ) 1200 एम.एम.चे हे पाईप मागील एक वर्षापासून एमआयडीसीच्या मोकळ्या प्लॉटवर साठवून ठेवले होते. या आगीत  मोठ्या प्रमाणात पाईप आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असले, तरी अग्निशमन दल, तारापूर एमआयडीसीचे अधिकारी व पोलिस यांच्या प्रसंगावधानाने क्रेनच्या साह्याने अनेक पाईप आगीपासून दूर केल्याने काही पाईप वाचण्यात यश आले.

(हेही वाचा : गाझापट्टीवरून भारतात ‘ट्विटर वॉर’!)

आगीचे निश्चित कारण समजले नाही!

आगीचे निश्चित कारण समजले नसले, तरी बोईसर पोलिसांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या पाईपच्या शेजारी हायड्रोक्‍लोरिक ऍसिडने भरलेल्या टँकरमधून झालेली रसायनाची गळती रस्त्यावरील कचऱ्यावर पडून त्या कचऱ्याला आग लागून शेजारच्या पाईपच्या साठ्यापर्यंत पोचली व अल्पावधीत आगीने रौद्ररूप धारण केले असावे, तरीही यासंदर्भात निश्चित कारणाचा शोध घेऊन जो दोषी व जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे एमआयडीसीचे पोलिस इन्स्पेक्टर प्रदीप कसबे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.