वाडिया हॉस्पिटलच्या शस्त्रक्रियागृहाला आग 

परेल येथील लहान मुलांचे रुग्नालय असलेल्या वाडिया हॉस्पिटल येथील शस्त्रकारागाराला आग लागली आहे. शुक्रवारी, ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता ही आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवण्यात आली आहे. ही आग लेव्हल २ ची आहे. ही आग पहिल्या माळातील शस्त्रक्रियागाराला आग लागली  तूर्तास कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. हा विभाग बंद करण्यात आला आहे

(हेही वाचा खारदांडा स्मशानभूमी पुढील काही दिवस राहणार बंद)

ऑपरेशन सुरु असताना लागली आग

जेव्हा येथील ऑपरेशन थिएटरला आग लागली, तेव्हा ऑपरेशन सुरु होते. शॉर्ट सर्किटने आग लागताच डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन थांबवले आणि रुग्णाला बाहेर काढले. तसेच पहिल्या माळ्यावरील सर्व वार्डातील रुग्णांना त्वरित इमारतीच्या बाहेर काढून बाह्यरुग्ण विभागात बसवण्यात आले. मात्र रुग्णांचे साहित्य आणि केसपेपर वार्डातच ठेवण्यात आले. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी का लागली ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण आगीच्या घटनेने परिसर प्रचंड हादरला आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील UPS खोलीतील विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, सेंट्रल ए.सी., दरवाजे, खिडक्या, लाकडी विभाजन इत्यादींपर्यंत आग पोहचली, तसेच वरच्या दोन मजल्यांच्या हॉस्पिटल इमारती आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने जवळच्या वॉर्डातील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here