मुंबईमधील (Mumbai) बीकेसी (bkc) येथील सरकारी इमारतीला (Goverment Office) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग कौटुंबिक न्यायालयाच्या (bkc Family Court) शेजारी असलेल्या बलराम इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर पसरली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
(हेही वाचा – Swatantrya Veer Savarkar Film : वीर सावरकरांचे कार्य घराघरात पोहचवण्यासाठी नाशिकमधील तरुणांचा अनोखा उपक्रम)
बीकेसी येथील निवृत्ती वेतन विभागाच्या इमारतीला ही आग लागली आहे. संबंधित इमारतीमध्ये आग नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली असून ही आग विजवण्यासाठी यंत्रणा कार्यन्वयीत केल्यानंतर देखील आग विझत नसल्याने अग्निशमन विभागला या आगीची माहिती देण्यात आली आहे. अग्निशामक दलाचे (mumbai fire brigade) चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आग विजविण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. संबंधित आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. भीषण आगीनंतर दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू असून वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community