मुंबईतील साकीनाका वायर गल्लीमध्ये अग्नितांडव

76

मुंबईतील साकीनाका येथील लोकप्रिय वायर गल्लीमध्ये भीषण आग लागल्याचं समोर आलं आहे. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल्या झाल्या आहेत. आगीच्या काही भागांवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी उर्वरित आगीचा भाग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न सुरू आहे. या आगीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसंच या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

साकीनाकातील गजबजलेला परिसर असलेल्या वायर गल्लीमधील ४ गोदामांना भीषण आग लागली आहे. या ठिकाणी ज्वलनशील वायरचे साठे अधिक असल्यामुळे आग एका गोदामातून दुसऱ्या गोदामात पसरत आहे. दरम्यान या परिसरातील छोट्या गल्ल्या अग्निशमन दलाच्या अडचणी होत आहेत. तरी देखील घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

माहितीनुसार, आग पसरतं असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

(हेही वाचा – ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.