दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर (Masjid Bandar) परिसरातील १२ मजली पन्ना अली मॅन्शन (Panna Ali Mansion) इमारतीला रविवारी (16 फेब्रु.) सकाळी आग लागली (Fire News). यात दोन महिलांचा मृत्यू झाला तर तीन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली, परंतु धूर संपूर्ण इमारतीत पसरला आहे. (Fire News)
हेही वाचा-आता तिकीट, कॅब, हॉटेल सर्व काही एकाच अॅपवर बुक करता येणार ; कधीपासून वापरता येईल SwaRail अॅप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील (South Mumbai) मस्जिद बंदर परिसरातील वडगडी येथील इसाजी स्ट्रीटवर असलेल्या पन्ना अली मॅन्शन या १२ मजली निवासी इमारतीला रविवारी सकाळी ६.११ वाजता आग लागली. इमारतीच्या मीटर बॉक्समधून आग लागली. यानंतर, मुंबई अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. (Fire News)
हेही वाचा-New Delhi Railway Station Stampede : ‘रेल्वेची ती एक सूचना आणि…’ ; हमालाने सांगितलं नेमकं काय घडलं?
दरम्यान, आगीमुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला, ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या सर्व पीडितांना जेजे हॉस्पिटल आणि जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यापैकी दोन महिलांचा जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Fire News)
जेजे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. याज्ञिक यांनी साजिया आलम शेख (३०) आणि सबिला खातून शेख (४२) यांच्या मृत्यूची पुष्टी केली. या घटनेत श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शाहीन शेख (२२) आणि आणखी एका पुरूषावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि दोघांचीही प्रकृती स्थिर आहे, असे डॉ. याज्ञिक यांनी सांगितले. करीम शेख (२०) या दुसऱ्या व्यक्तीला जीटी रुग्णालयात नेण्यात आले आणि त्याची प्रकृतीही स्थिर असल्याचे सांगण्यात आले. (Fire News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community