गोरेगाव पश्चिम येथील आस्मि औद्योगिक वसाहतीतील (Asmi Industrial Complex) गोदामाला बुधवारी (२४ जानेवारी) संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली.गोरेगाव मधील आगीची ही दुसरी घटना आहे. आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. या आगीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. (Mumbai Fire)
बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला आगीची माहिती मिळाली. कंपनीतील तळमजल्यावरील दुकानांमधील भंगार सामानाला आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे. अधिक तपास सुरु आहे. राम मंदिर रेल्वे स्टेशन पुलाजवळील गोरेगावच्या आस्मि औद्योगिक संकुलात ही आग लागली. भीषण आगीचे अनेक व्हिडिओ एक्स वर समोर आले. या व्हिडिओं मध्ये या भागातून निघणाऱ्या उंच ज्वाला आणि दाट काळ्या धुराचे लोळ दिसले.(Mumbai Fire)
(हेही वाचा : Mumbai Fire : गोरेगावमध्ये इमारतीच्या २५व्या मजल्यावर भीषण आग)
मृणाल ताई गोर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद
अस्मि औद्योगिक संकुलातील दुकानांमध्ये लेव्हल-3 आग लागली. डिझेलचे गोदाम आणि भंगार सामग्रीची दुकाने आगीत भस्मसात झाली. या घटनेनंतर मृणाल ताई गोर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community