भांडुपच्या आगीत सनराइज रुग्णालयतील नऊ जणांचा होरपळून मृत्यू!

94

भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री बाराच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर कोविड रुग्णांवर उपचार करणारे सनराइज हे रुग्णालय असून, या आगीच्या धुराचे लोळ रुग्णालयात पसरल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार तीन रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.

तिघांचा मृत्यू

या रुग्णालयात ७३ कोविड रुग्ण उपचार घेत होते. या सर्वांना मुलुंड कोविड सेंटर, फोरटीस रुग्णालय व इतर वेगवेगळ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आग पुन्हा एकदा वाढली असल्याने आगीत तीन कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. निसार जावेद चंद्र(७४), गोविंदलाल दास(८०), मुंगेकर(६६) अशी मृतांची नावे आहेत. तर चेतनदास गोडवाणी(७८), माधवी गोडवाणी(६८) अशी जखमींची नावे आहेत. तसेच अजूनही काही रुग्णांचा मत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात यश

भांडुप स्टेशन जवळ ड्रीम मॉल आहे. या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर हे सनराइज रुग्णालय आहे. रात्री ही आग रुग्णालयात लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. आगीच्या धुरामुळे नक्की आग कुठे लागली हे समजून येत नव्हते. याठिकाणी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात असल्याने या आगीची तीव्रता अधिक पसरली. धुराचे लोळ रुग्णालयात पसरल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे धुरापासून बचाव करण्यासाठी रुग्ण आणि कर्मचारी यांनी गच्चीवर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे आत अडकलेल्या रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केले. यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यातून प्रत्येक रुग्णाला कोविड केंद्रात तसेच अन्य रुग्णालयात हलवण्यात येत होते.

स्थानिक नगरसेवकांनी केले मदतकार्य

७३ या रुग्णांपैकी ३० रुग्णांना मुलुंड येथील जम्बो कोविड केंद्रात हलवण्यात आले. ३ रुग्णांना फोरटीस आणि उर्वरित रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पण याबाबत सनराइज रुग्णालयाकडून हलगर्जी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज होती अशा रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. या आगीच्या घटनेनंतर त्वरित अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. घटनास्थळी १४ फायर इंजिन,१० जेटी,१ एएलपी, १ बी ए व्हॅन, १०८ क्रमांकाच्या १० रुग्णवाहिका व २ अन्य या प्रमाणे १२ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात केली होती. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.