Filmcity परिसरात १५ दिवसांत दुसऱ्यांदा आग; परिसरात सर्वत्र अनधिकृत वखारींचा प्रश्न ऐरणीवर

218
Filmcity परिसरात १५ दिवसांत दुसऱ्यांदा आग; परिसरात सर्वत्र अनधिकृत वखारींचा प्रश्न ऐरणीवर
Filmcity परिसरात १५ दिवसांत दुसऱ्यांदा आग; परिसरात सर्वत्र अनधिकृत वखारींचा प्रश्न ऐरणीवर

फिल्मसिटी (Filmcity) परिसरात पुन्हा एकदा वखारींना आग लागली आहे. ग्राऊंड फ्लोरवरील दुकाने, झोपड्यांपर्यंत ही आग पोहचली. फिल्मसिटी रोडवरील रत्नागिरी हॉटेलजवळ (Ratnagiri Hotel), वाघेश्वरी मंदिराजवळ, गोरेगाव (Goregaon) पूर्व येथे ही आग लागली. या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान आगीची माहिती मिळताच पोलिस दल, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.

हेही वाचा : २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती करणार; CM Devendra Fadnavis यांचे विधान)  

यासंदर्भात स्थानिक माजी नगरसेवक प्रीती सातम (Priti Sata) म्हणाल्या की, फिल्मसिटी परिसरात अवघ्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा लाकडाच्या वखारीला आग लागली आहे. यापूर्वी झालेल्या आगीच्या घटनेनंतर संबंधित वखारींची योग्य तपासणी करून कारवाई झाली असती, तर ही दुर्घटना टाळता आली असती. मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) पी दक्षिण विभागाचे अधिकारी अजूनही या अनधिकृत वखारींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? सतत लागणाऱ्या आगीमुळे लोकांचे जीव धोक्यात येत असताना, प्रशासन डोळे झाकून बसणार आहे का? पी दक्षिण विभागाने यावर जबाबदारी घेऊन तातडीने कारवाई करावी आणि या परिस्थितीचे उत्तर द्यावे!, अशी मागणी सातम (Priti Sata) यांनी केली आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.