Fire : विमानतळावरील फेअरमाँट हॉटेलमध्ये आग; ८० नागरिकांची सुखरूप सुटका

102
Fire : विमानतळावरील फेअरमाँट हॉटेलमध्ये आग; ८० नागरिकांची सुखरूप सुटका
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल क्रमांक-२ जवळ असलेल्या फेअरमाँट या दहा मजली हॉटेलच्या गच्चीवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास आग (Fire) लागण्याची दुर्घटना घडली. त्यामुळे हॉटेलमध्ये आणि परिसरात खळबळ उडाली. ही आग वातानुकूलित यंत्रणेला लागून पसरली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या हॉटेलच्या इमारतीमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या ८० नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच सुखरूप सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

(हेही वाचा – कवी कट्टा म्हणजे साहित्याचे ऊर्जा केंद्र; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे विधान)

मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले (पूर्व), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तळघर, तळमजला अधिक दहा मजली फेअरमाँट हे हॉटेल असून या हॉटेल इमारतीच्या गच्चीवर शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास आग (Fire) लागली. ही आग हळूहळू पसरली. या आगीची माहिती मिळताच हॉटेलच्या इमारतीमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. काही नागरिकांनी जिवाच्या भीतीने इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. तर, हॉटेलमधील विविध ठिकाणी ८० जण अडकून पडले होते. त्यानंतर घटना स्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य हाती घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ इमारतीमध्ये मजल्यांवर अडकलेल्या ८० नागरिकांची सुखरूप सुटका करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले. अन्यथा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती.

(हेही वाचा – Coastal Road वरील ‘त्या’ मास्टिकच्या थर काढला जातोय उकरुन; नव्याने केले जाणार डांबरीकरण)

ही आग हॉटेलच्या एसी युनिट आणि एक्झॉस्ट डक्टिंगमध्ये लागली होती, असा अंदाज आहे. तसेच, आग लागल्यावर ही आग अंदाजे १,००० ते १,५०० चौरस फूट क्षेत्रात पसरली होती. आगीची तीव्रता पाहता अग्निशमन दलाने सायंकाळी ५.४२ वाजता आग स्तर-१ ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाने ३ फायर इंजिन, ३ जंबो वॉटर टँकर, हाय प्रेशर पंप यांच्या साहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळी ६.५० वाजता संपूर्ण आग (Fire) विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र आग का आणि कशी काय लागली याबाबत अग्निशमन दलाचे आणि पोलिसाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी पुढील तपास करत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.