Fire : बोरीवलीतील कनाकिया टॉवरमध्ये आग, धुराने गुदमरल्याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

375
Fire : बोरीवलीतील कनाकिया टॉवरमध्ये आग, धुराने गुदमरल्याने ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

बोरीवलीतील मागाठाणे मेट्रो रेल्वे स्थानकासमोरील कनाकिया समर्पण टॉवरच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत इलेक्ट्रीक डकमध्ये शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याने धुरामुळे गुदमरल्याने एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. (Fire)

(हेही वाचा – Onion Mahabank Project : राज्यात नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबॅंक, शेतकऱ्यांना दिलासा)

बोरिवली (पूर्व), मागाठाणे मेट्रो स्टेशन समोर, कनाकिया सर्मपण टॉवर येथे तळमजला अधिक २२ मजल्यांची इमारत असून इमारतीच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास इलेक्ट्रीक हक मध्ये शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. ही आग अग्निशमन दलामार्फत दुपारी ०१:०२ वा विझविण्यात आली. आग लागल्यामुळे निर्माण झालेल्या धुराने गुदरमलेल्या ४ रहिवाश्यांना उपचारार्थ ऍपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात धुरामुळे गुदमरल्याने महेंद्र शहा (७०) यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले आहे. तर रंजना रजपूत (५९), शिवानी रजपूत (२६ वर्षे), शोभा सावळे (७०) यासर्वांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे ऍपेक्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाला कळवले आहे. (Fire)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.