Gujarat मध्ये अग्नितांडव! फटाक्याच्या कारखान्याला आग; १७ लोकांचा मृत्यू

56
Gujarat : राज्यांसह देशभरात मागील काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. या अग्नितांडवात लाखो रुपयांचे नुकसान होते. अशीच घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेत फटाक्याच्या कारखान्याला आग (Gujrat Factory Explosion) लागली असून, या  आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला. तसेच दुर्घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. आगीनंतर कारखान्‍यात एकामागोमाग एक स्‍फोट झाले. कारखान्याचे काही भाग कोसळले. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Gujarat)
गुजरातमधील बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल (District Collector Mihir Patel) यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, “मंगळवारी ०१ एप्रिलला सकाळी आम्हाला डीसाच्या औद्योगिक क्षेत्रात (Deesa MIDC) स्फोट झाल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. आतापर्यंत कारखान्यातील ढिगाऱ्यातून १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संपूर्ण आरसीसी स्लॅब कोसळला आहे. मदत पथके ढिगारा काढत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या चार जणांची प्रकृती स्थिर आहे. पोलीस तपास सुरू आहे.


(हेही वाचा – Sambhaji Nagar च्या उपजिल्हाधिकाऱ्याना जीवे मारण्याचा कट रचणारा निघाला मनोज जरांगेंशी संबंधित)

दरम्यान, दीपक ट्रेडर्स (Deepak Traders) नावाच्या कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. या ठिकाणी फटाके तयार केले जातात. स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. जिल्हाधिकारी माहिर पटेल घटनास्थळी पोहोचले आहेत. या कारखान्याला फटाके तयार करण्याचा परवाना मिळाला होता की नाही? याची चौकशी सध्या केली जात आहे.     

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.