नायर रुग्णालयातील दंत विभागाच्या इमारतीला 10 व्या मजल्यावर शनिवार, 6 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत (Fire) मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले आहे.
(हेही वाचा Mamata Banerjee : लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘ईदी’चा शिधा; लुंगी, नमाजी टोपी, शेवया आणि सुका मेवा )
G+11 मजल्यांच्या वसतिगृह इमारतीच्या 10 व्या मजल्यावरील खोलीतील भीषण आग लागली. त्या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, बेड, लाकडी कपाट, पुस्तके, कागदपत्रे, कपडे इत्यादी साहित्य आगीत जळून खाक झाले. ही आग (Fire) सायंकाळी 7 वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. अग्निशमन दलाच्या आगमनापूर्वी ०१ डीसीपी एक्टिंग्विशर आणि पाण्याच्या बादल्या वापरून आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर एफ/एम द्वारे पाण्याच्या बादल्या वापरून ही आग विझवण्यात आली. या आगीत कोणीही घायाळ झाला नाही.
Join Our WhatsApp Community