गुजरातमधील वलसाडमध्ये तिरुचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणारी हमसफर एक्सप्रेसला आग लागली. (Fire In Train) वलसाडमधून जात असताना तिरुचिरापल्ली जंक्शन ते श्री गंगानगर जंक्शनकडे जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 22498 च्या पॉवर कार/ब्रेक व्हॅन कोचमध्ये आग आणि धूर दिसला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ट्रेनमधून डबा वेगळा केल्यानंतर तो लवकरच रवाना करण्यात येणार आहे. ट्रेनच्या जनरेटर डब्याला आग लागली. ट्रेनला आग लागताच घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जनरेटरच्या डब्याला आग प्रवाशांच्या डब्यातही लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आग लागलेले डबे ट्रेनपासून वेगळे करण्यात आले. मात्र, आगीमुळे जीवित वा वित्तहानी झालेली नाही, असे पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी सांगितले. (Fire In Train)
(हेही वाचा – प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर स्लिपमोड मध्येच; ISROचे प्रयत्न सुरूच )
यापूर्वी जेकोट रेल्वे स्थानकावर दाहोद आनंद मेमू ट्रेनच्या इंजिनला भीषण आग लागली होती. रेल्वेच्या इंजिनला लागलेल्या आगीच्या ज्वाळा २ बोगीत पसरल्या. या वेळी घटनास्थळी आरडाओरडा आणि चेंगराचेंगरी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सुदैवाने शेवटच्या डब्याला आग लागल्याने उर्वरित डबे आगीपासून वाचले. (Fire In Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community