Fire Incidents : मुंबईत तीन वर्षात १३ हजार आगीच्या घटना, ६५ मृत्यू

151
Fire Incidents : मुंबईत तीन वर्षात १३ हजार आगीच्या घटना, ६५ मृत्यू
  • सुजित महामुलकर

गेल्या तीन वर्षात मुंबईत आगीच्या १३ हजार घटना घडल्या असून त्यात ६५ जणांना आपला जीव गमवावा लागला तर ४७३ जण जखमी झाल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. (Fire Incidents)

मुंबईतील आगीच्या घटना रोखण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत दहिसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी प्रश्न विचारले, त्याला शिंदे यांनी लेखी उत्तर दिले. या उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील आकडेवारी समोर सादर केली. (Fire Incidents)

अग्निसुरक्षाविषयी प्रश्न

चौधरी यांनी आणखी काही प्रश्न विचारले. त्यात, सदर घटनांमध्ये वाढ झाल्याने अग्निसुरक्षा तपासणीसाठी अग्निशमन दलाने गेल्या वर्षभरात केलेल्या तपासणीत २७८ इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे का? तसेच त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत का? सदर प्रकरणी शासनाने चौकशी करुन आगीच्या घटना रोखण्यासह अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्यासंदर्भात व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? असे प्रश्न उपस्थित केले. (Fire Incidents)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या भाषणावर आले नियमांचे गंडांतर; जाणून घ्या काय आहेत संसदेत बोलण्याचे नियम)

१,२७० इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी

या प्रश्नांना लेखी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी २७८ इमारतींना आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण १,२७० इमारतींची अग्निसुरक्षाविषयक तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये इमारतींमधील आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या. तपासणीअंती आढळून आलेल्या या त्रुटींची विहित कालावधीत पूर्तता करण्यासाठी त्यांना महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे शिंदे यांनी म्हटले. (Fire Incidents)

वीज-पाणी कापण्याचा इशारा

या इमारतींना अग्निशमन विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न केल्यास वीज व पाण्याच्या जोडण्या कापण्याचा इशाराही अग्निशमन दलाने दिला. त्यानंतर संबंधितांनी त्रुटींची पूर्तता केली आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेस कळविल्यानंतर त्याची खातरजमा करुन घेण्यात आली आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अधिकाऱ्यांवरील कारवाईबाबतच्या प्रश्नाला ‘प्रश्न उद्भवत नाही’ असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. (Fire Incidents)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.