धारावीमध्ये रात्री ३ वाजण्याच्या सुमारास गोदामाला आग लागली. यात ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशनम दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे कारण समजू शकलेले नाही. रात्रीच्या सुमाराच आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ उडाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, ६ जण आगीमध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आग विझवण्यात आली आहे, सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Mumbai, Maharashtra | 6 people injured in a fire broke out at Dharavi. 10 fire tenders reach the spot. Fire is confined to wooden material and furniture, in partly ground plus upper three floored and partly ground plus four floored structure: BMC
— ANI (@ANI) May 28, 2024
जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार, काळा किल्लाजवळ अशोल मिल कम्पाऊंट येथे ३ वाजून ४५ मिनिटांनी एका तीन मजली गोदामाला आग लागली. आगीची माहिती प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर १० अग्निशन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या होत्या. काही तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. स्थानिकांनीदेखील आग विझवण्यासाठी प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community