मुंबईत सध्या आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत असून, या वाढत्या आगींवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्यावतीने शर्थीने प्रयत्न केले जात आहे. परंतु या आगी लागण्याच्या प्रकाराबाबत प्रत्येक नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्नीसेवा सप्ताह आयोजित केला असून, त्यामध्ये आता सेलिब्रेटीजच्या माध्यमातून जनतेला संदेशही दिला जात आहे.
त्यामुळे मराठी चित्रपट अभिनेत्री आणि वाजले की बारा फेम अमृता खानविलकर यांनीही आता आगीशी खेळू नका, असाच संदेश जनतेला दिला आहे. आता जनतेनेही आगीच्या घटना कशाप्रकारे टाळता येतील यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे.
(हेही वाचाः शिवसेनेच्या चुकीमुळेच सहा वर्षांपासून ४ लाख कुटुंबे हक्काच्या पाण्यापासून राहिली वंचित)
अग्नीसुरक्षेची जनजागृती
मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने मुंबईकरांना अग्नीसुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले असून, या सप्ताहात आगीबाबत जनजागृती केली जात आहे. मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने सध्या मुंबईभर जाहिरात करत, कर योग्य वायर्स आणि स्विचेस वापरा अशाप्रकारे संदेश देणारे बॅनर्स लावलेले आहेत.
अमृता खानविलकरचा संदेश
या सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब यांनी महापालिका कलावंत संघटनेच्या पारितोषिक समारंभाला उपस्थित असलेल्या चंद्रमुखी सिनेमाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर व अभिनेत्री अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे यांना अग्निसुरक्षा सेवा सप्ताहानिमित्त संदेश देण्याची विनंती केली. ही सूचना अमृता खानविलकरने मान्य करत त्वरित संदेश देण्याची तयारी दर्शवली.
(हेही वाचाः किल्ले जगायला शिकवणारा ‘माणूस’,अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे गो.नी.दांची महती सांगणारा माहितीपट)
मुंबईकर काय करणार?
त्यानुसार खानविलकर यांनी सेवा सप्ताहाच्या निमित्ताने संदेश देताना, आगीमुळे मालमत्तेची हानी होतेच, शिवाय जीवाचीही हानी होते. त्यामुळे आगीशी खेळू नका, असे त्यांनी सांगितले. अमृताचा हा संदेश आता मुंबईकर किती मनावर घेऊन आगीशी खेळण्याचे टाळण्यासाठी आग प्रतिबंधक उपायोजनांची काटेकोर अंमलबजावणी करतात, हे पहायचे आहे.
Join Our WhatsApp Community