राज्यात महामार्गावरील दुर्घटनांच्या (Highway accident) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही खूप जास्त आहे. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर कोलाड (Kolad bus fire) येथे २२ डिसेंबरला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास खासगी प्रवासी बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. (Mumbai Goa Highway)
(हेही पाहा – Pakistan मधील मंदिरांचे होत आहेत मदरसे आणि हॉटेल; ४२८ पैकी आता राहिली फक्त २२ मंदिरे)
रायगड जिल्ह्यातील (Raigad District) कोलाड येथे खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. बसमध्ये चालक आणि क्लिनरसह ३४ प्रवासी होते. खापरोबा ट्रॅव्हल्सची ही एसी स्लीपर कोच बस मुंबईतील जोगेश्वरी येथून मालवणकडे निघाली होती. कोलाड रेल्वे पुलाजवळ आली असता बसच्या मागील बाजूस मोठा आवाज झाला. तेव्हां ड्रायव्हरने गाडी थांबवून पाहिले असता बसने मागील बाजूस पेट घेतल्याचे दिसल यावेळी बचाव कार्यासाठी धाटाव एमआयडीसी (Dhatav MIDC), दीपक नायट्रेट कंपनी यांचे अग्नीशमन दल, कोलाड रेस्क्यू टीम आणि पोलीस यांनी बचाव कार्य केले व आगीवर नियंत्रण आणले. तातडीने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने ३४ प्रवांशांचा जीव वाचला मात्र सामान जाळून खाक झाले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community