Fire Service Week : रुग्णालये, व्यापारी-निवासी संकुल, शाळांमध्ये होणार मॉक ड्रील

1053
मुंबई महानगरपालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) मुंबई अग्निशमन दलाद्वारे अग्निशमन सेवा दिन (Fire Service Day) निमित्ताने सोमवार,  १४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालय प्रांगणात शहीदांना श्रद्धांजली कार्यक्रम होणार आहे. (Fire Service Week)
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती  असणार आहे. तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री. प्रशांत गायकवाड यांचीदेखील उपस्थिती असणार आहे.
वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४-२५ अंतिम फेरी
वार्षिक अग्निकवायत स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन शुक्रवार  १८ एप्रिल २०२५ रोजी भायखळा येथील प्रादेशिक समादेश केंद्रात करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांची उपस्थिती असणार आहे. तसेच अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान,  १४ एप्रिल २०२५ ते  २० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘अग्निशमन सेवा सप्ताह’चे देखील आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षा विषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे.
अग्निशमन सेवा सप्ताह निमित्ताने, मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्राधान्य देतानाच अद्ययावत अग्निशमन तंत्रज्ञानाचा अवलंब करत आगीसारख्या घटनांमध्ये किमान कालावधीत प्रतिसाद देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच, शाळा, रुग्णालये तसेच व्यापारी संकुल याठिकाणी अधिकाधिक नागरिकांना अग्निसुरक्षेबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिल्या आहेत.
प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम यांचे आयोजन
वरिष्ठांच्या निर्देशानुसार, अग्निशमन सेवा सप्ताह अंतर्गत  १४ एप्रिल २०२५ ते  २० एप्रिल २०२५ या कालावधीत मुंबईत विविध ठिकाणी अग्निप्रतिबंध व अग्निसुरक्षा विषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अग्निसुरक्षा रॅली, अग्निशमन उपकरणांचे प्रदर्शन, अग्निसुरक्षेविषयी जनजागृती बाबत भित्तिपत्रकांचे वाटप, व्याख्याने व प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. तसेच मुंबई महानगरातील रुग्णालये, व्यापारी संकुल, शाळा, निवासी संकुल इत्यादी ठिकाणी आग लागल्यास कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
जिओ कन्व्हेन्शन सेंटर (Jio World Convention Centre, वांद्रे), इएसआयसी रूग्णालय (कांदिवली), फोर्टिस रूग्णालय (मुलुंड), भाटिया रूग्णालय (ताडदेव), लोकमान्य टिळक रूग्णालय (शीव) आदी ठिकाणी प्रात्यक्षिके आणि रंगीत तालीम सादर करण्यात येणार आहेत.
१२५ शाळा, रहिवासी संकुलांमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिके
मुंबईतील शाळा आणि रहिवासी संकुलाच्या ठिकाणी अग्निसुरक्षेवरील व्याख्याने आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदीची माहिती देण्यात येणार आहे.
याबरोबरच, त्यासोबतच १२५ शाळा आणि रहिवासी संकुल येथे अग्निसुरक्षेवरील व्याख्याने तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक अवस्थेतील आग शमवण्याच्या पद्धती, फायर एक्टिंग्विशरचा वापर, स्वयंपाक घरातील गॅस गळती रोखण्याचे उपाय आदीची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येणार आहे.
अग्निसुरक्षा विषयक भित्तिपत्रकांचे वितरण
मुंबईतील उंच इमारती, निवासी चाळी, व्यापारी संकुले यासारख्या ठिकाणी भित्तिपत्रके प्रदर्शित करून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आग लागल्यास किंवा गॅस गळतीसारख्या घटनांमध्ये नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी माहिती देण्यात येणार आहे.
अग्निशमन सेवा सप्ताह’आयोजनाची पार्श्वभूमी
१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीमध्ये एस.एस. फोर्ट स्टिकीन या बोटीमध्ये महाप्रचंड स्फोट होऊन गोदीमध्ये अग्निप्रलय झाला. या अग्निप्रलयाशी झुंज देताना मुंबई अग्निशमन दलाचे ६६ जवान व अधिकारी यांनी प्राणाहुती दिली. या अग्निशमन सेवेतील वीरात्म्यांना मानवंदना देण्यासाठी भारत सरकारने १९६८ मध्ये १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून जाहीर केला. तेव्हापासून १४ एप्रिल ते २० एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो. (Fire Service Week)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.