विशेष प्रतिनिधी, मुंबई
वारंवार पाहणी करून किंवा नोटीस देऊनही अग्निरोधक प्रणाली (Fire System) न लावणाऱ्या किंवा त्या अद्ययावत न ठेवणाऱ्या मालमत्ता धारकांवर आणि इमारतींवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आगीसारख्या आपत्तींसाठी जबाबदार असलेल्यांवर पोलिसांकडून यथोचित कारवाई केली जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेकडूनही जबाबदारी निश्चित केली जावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.
मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात भूषण गगराणी यांनी सोमवारी २० मे २०२४) सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन सुमारे तीन तास आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. (Fire System)
(हेही वाचा – Aam Aadmi Party अमेरिकेसह अरब देशातून मिळाली ‘फंडिग’)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी रविंद्र अंबुलगेकर, अग्निशमन दलाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या आढावा बैठकीपूर्वी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी अग्निशमन दलाची वाहने, विविध उपकरणे तसेच तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अग्निशमन यंत्र, फायर इंजिन, फोम टेंडर्स, फायर रोबोट, कंट्रोल पोस्ट व्हॅन, फायर बाईक आदींचा समावेश होता. दरम्यान, त्यांनी फायर इंजिनच्या शिडीच्या साहाय्याने जमिनीपासून सुमारे ९० मीटर उंच अंतरावर जाऊन पाहणी केली. (Fire System)
आढावा बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त गगराणी पुढे म्हणाले की, मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षिततेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मोठे योगदान आहे. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जाणारे कार्य प्रशंसनीय आहे. अग्निशमन दलात कोणतेही वाहन किंवा तंत्रज्ञान समाविष्ट करताना ते किती अद्ययावत आहे, इतकेच पाहू नये. तर, संकटसमयी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची उपयुक्तता तपासावी. दुर्घटनांदरम्यान स्वयंसेवक, नागरिकांकडूनही बचावकार्यात मदत होत असते. अशा स्वयंसेवकांचा, नागरिकांचा यथोचित गौरव व्हायला हवा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community