मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल)मधील सरबंगपूरमध्ये श्री महाकालीदेवीच्या मिरवणुकीच्या (mahakali procession) वेळी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. यात एक जण जखमी झाला. त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा गोळीबार धावत्या बसमधून करण्यात आला. स्थानिक लोकांनी ही बस रोखली आणि नियंत्रणात घेतली. त्यांनी येथे रस्ता बंद आंदोलन चालू केले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस तेथे पोचले. (West Bengal)
(हेही वाचा – चीनमध्ये Metapneumovirus चे थैमान; नव्या वर्षात कोविड-१९च्या आठवणींनी भीतीचे वातावरण)
देवी कालीच्या मिरवणुकीत रस्त्यावर भाविक जमले होते, त्याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी चालत्या बसमधून मिरवणुकीला लक्ष्य केले आणि अनेक गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या बसमधून गोळ्या झाडण्यात आल्या, त्या बसचा ताबा परिसरातील स्थानिकांनी घेतला असून या गोळीबाराच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केला. यानंतर नौदा पोलीस ठाण्यातून मोठा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
मुर्शिदाबादमध्ये मुसलमानाच्या घरात बाँबस्फोट
मुर्शिदाबाद (Murshidabad) येथील रामकृष्ण पल्ली भागातील एका मुसलमानाच्या घरात झालेल्या बाँबस्फोटात फरीद शेख नावाची व्यक्ती जखमी झाली. भाजपचे आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी फरीद शेख तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याचा दावा केला. त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
हेही पहा –