पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवारी, 12 एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ गोळीबार झाला. हा गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव तानाजी पवार असे असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या.
पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तूलातून गोळी झाडली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिस तपास करीत आहेत.
(हेही वाचा : मराठा आरक्षणावरुन नितेश राणेंचा सरकारवर घणाघात!)
पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीला उधाण!
सध्या पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. अशातही जिल्ह्यात विशेषत: पुणे आणि पिंपरी-चिंचवड ह्या शहरी भागात गुन्हेगारीत वाढ झालेली आहे. नुकतेच मागील २ आठवड्यात या ठिकाणी एका पोलिस हवालदाराचा गळा चिरून खून करण्यात आला होता. त्यानंतर एका पोलिस उपनिरीक्षकाच्या आईचा धारधार शस्त्रांनी खून करण्यात आला होता. आता चक्क लोकप्रतिनिधीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनासोबत आता कायदा सुव्यवस्थाही बिघडली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Join Our WhatsApp Community