मुंबईतील Coastal Road बोगद्यात पहिला अपघात; उद्घाटनानंतर काही दिवसांतच घडली घटना

376

मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road)  बोगद्यात गुरुवारी, ४ एप्रिल रोजी पहिला अपघात झाला. अपघातानंतर कोस्टल रोड बोगद्याच्या आत वाहतूक कोंडी दिसून आली. झालेल्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कोरोला अल्टीस कार धडकल्याचे पहायला मिळाले. यात धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. खराब झालेली गाडी बाहेर पडण्याच्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेला नेली जात असल्यानेही वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदारांची काय आहे ‘मन की बात’? केंद्राच्या कामावर नाखुश; पण…)

कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने हा अपघात घडला

इमर्जन्सी कॉल बॉक्स (ECB) मधून एका व्यक्तीने कॉल केला की CP-5 जवळ बोगद्यामध्ये कार अपघात झाला आहे. लोकल ऑपरेशन मेंटेनन्स रूमने सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील घटना तत्काळ तपासली आणि संबंधित विभागाला माहिती दिली. त्यानंतर मार्शलसह बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच टोइंग व्हॅनही बोलवण्यात आली. मार्शल्सने वाहतुकीवर नियंत्रित मिळवण्याचे काम केले. कार चालकाच्या सांगण्यानुसार, कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने हा अपघात घडला. यावेळी कारमध्ये दोन जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे बोगद्याच्या आत तेल घसरले होते. हे मार्शल टीमने साफ केले आहे. दरम्यान तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचे (Coastal Road) उद्घाटन करण्यात आले. कोस्टल रोडकडे मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची खूण म्हणून पाहिले जाते. मात्र आता या रोडवरही अपघात झाला आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.