महागाईचा विस्फोट झाला असतानाच, आता सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. रेल्वेने तिकीट दर कमी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 10 किमीच्या फर्स्ट क्लास लोकल प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागत होते. आता हा प्रवास 25 रुपये मोजावे लागणार आहेत. एसी लोकलच्या प्रवासासाठी 65 ऐवजी 35 रुपये मोजावे लागणार आहेत.
फर्स्ट क्लास डब्याचे तिकीट दर कमी
View this post on Instagram
वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्याच्या दैनंदिन तिकिटात कपात करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच केली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य- पश्चिम रेल्वेवरील सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लास डब्याचे तिकीट दर कमी झाले आहेत. त्यानुसार 10 किमीसाठी 25 रुपये तिकीट आकारले जाईल. 130 किमीच्या प्रवासासाठी 255 ऐवजी 150 रुपये आकारले जाणर आहेत. एसी लोकलच्या 330 ऐवजी 165 रुपये आकारले जाणार आहेत.
( हेही वाचा: घाटी लोकांना क्रिकेटमधले काय कळते? या एका वाक्यावरुन झाला ‘वानखेडे स्टेडिअम’चा जन्म )
पासच्या रकमेत बदल नाही
रावसाहेब दानवे यांनी फक्त तिकीटांचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे. कोणत्याही लोकलच्या मासिक पासच्या रकमेत कोणताही बदल केलेला नाही.