२६ जानेवारीला लॉंच होणार देशातील पहिली नेझल लस! किती असणार किंमत?

197

प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला देशातील पहिली नेझल लस लॉंच करण्यात येणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना लसीचा डोस हा इंजेक्शनद्वारे घेतला जात आहे. परंतु आता भारत बायोटेकने देशात निर्माण केलेली नेझल लस ही नाकावाटे घ्यायची आहे.

( हेही वाचा : ‘या’ आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदत घ्या )

म्युकोसात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणारी नेझल लस 

कोरोनाचे इंजेक्शन घेण्याची गरज भासू नसे यासाठी या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीची निर्मिती करण्यात आली. भारत बायोटेकच्या या नेझल व्हॅक्सिनसाठी २३ डिसेंबरला केंद्र सरकारने परवानगी दिली होती. नाकावाटे घ्यायची ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये ही लस खासगी रुग्णालयात मिळणार आहे. नाकातील म्युकोसाद्वारे कोरोना आणि व्हायरल इन्फेक्शन होते. नेझल व्हॅक्सिन थेट म्युकोसात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. नेझल व्हॅक्सिन लसीकरणाची परवानगी केवळ १८ वर्षांवरील नागरिकांना आहे.

भारत बायोटेकला या महिन्याच्या सुरुवातीला सेंट्रस ड्रग्ज स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनकडून देशात अनुनासिक लस विकण्याची मान्यता मिळाली. ही लस CoWIN वर सुद्धा उपलब्ध आहे. हा डोस थेट श्वासोच्छवासाच्या मार्गांमध्ये पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. दरम्यान, भारताच्या वॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल त्यांना नेझल व्हॅक्सिन घेता येणार आहे.

किंमत किती असणार?

भारत बायोटेकने घोषणा केल्याप्रमाणे सरकारी रुग्णालयांमध्ये प्रति डोस ३२५ रुपये आणि खासगी लसीकरण केंद्रांना हा डोस ८०० रुपये प्रति या दराने विकला जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.