ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीबाबत अनेक मोठए निर्णय घेतले आहेत. ट्विटरचे सीईओ आणि सीएफओ यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी ट्विटर अकाऊंटच्या ब्लू टिकसाठी चार्ज घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ट्विटर युजर्समध्ये नाराजी असून भारतातील ट्विटरच्या पहिल्या यूजर नयना रेडू यांनी या निर्णयावर भाष्य केले आहे.
तेव्हाच मी निर्णय घेईन
मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक सुविधा मिळवण्यासाठी युजर्सकडून दरमहा 8 डॉलर्स म्हणजेच 650 रुपये चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबत भारतातील पहिल्या ट्विटर यूजर नयना रेडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ब्लू टिकसाठी किती पैसे आकारले जाणार याबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. ब्लू टिकचा अर्थ आता आहे तसाच राहील की भविष्यात तो बदलेल, याबाबतचा निर्णय झाल्यावरच मी काही ठोस निर्णय घेऊ शकेन, असे नयना यांनी म्हटले आहे.
आता पैसे का मोजू?
गेल्या 16 वर्षांत मी ब्लू टिक सुविधेसाठी एकही रुपया दिलेला नाही. मग आता मी त्यासाठी पैसे का मोजू? मुळात ब्लू टिकची ज्यांना गरज नाही ते ही सुविधा नाकारु शकतात. तसेच ज्यांना ही सुविधा हवी आहे ते पैसे घेऊन ही सुविधा घेऊ शकतात. त्यामुळे याचा सर्वसामांन्यांना फटका बसेल, असे मला वाटत नाही असेही नयना म्हणाल्या.
कोण आहेत नयना?
नयना रेडू या 16 वर्षांपूर्वी ट्विटरच्या यूजर झाल्या होत्या. 13 जुलै 2006 ला ट्विटर लाँच झाल्यानंतर नयना यांनी आपले ट्विटर अकाऊंट सुरू केले होते. त्या एक फोटोग्राफर आणि ब्लॉगर आहेत. भारतातील पहिल्या ट्विटर यूजर म्हणून त्यांची ओळख आहे.
Join Our WhatsApp Community