First Marathon 2024: अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहतूक नियंत्रण विभागाकडून अधिसूचना जारी

नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पार्यायी मार्गावरून जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

291
Marathon 2024: अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहतूक नियंत्रण विभागाकडून अधिसूचना जारी
Marathon 2024: अटल सेतूवर पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, वाहतूक नियंत्रण विभागाकडून अधिसूचना जारी

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर एमएमआरडीए विभागाकडून रविवारी (१८ फेब्रुवारी) सकाळी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. (First Marathon 2024) अटल सेतूवरील ही पहिलीच मॅरेथॉन आहे. (first marathon competition on Atal Setu) अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी स्पर्धेला झेंडा दाखवला आहे.

या मॅरेथॉनमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त धावपटू सामील होणार आहेत. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना (First Marathon 2024) जारी केली आहे तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पार्यायी मार्गावरून जाण्याबाबत सांगण्यात आलं आहे.

(हेही वाचा – Narendra Modi: भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर १०० दिवस काम करावे, पंतप्रधानांचे राष्ट्रीय अधिवेशनात आवाहन )

इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित
एमएमआरडीए विभागाकडून अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर 18 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 ते दुपारी 12 या कालावधीत होणाऱ्या मॅरेथॉनला कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, तसंच मॅरेथॉन कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावा, यासाठी अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर दोन दिवस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. तसंच, अटल सेतू बंद असलेल्या कालावधीत उरणकडून अटल सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना गव्हाण फाटा, उरण फाटा, वाशी मार्गे पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

वाहनांना पर्यायी मार्ग
पुण्याहून अटल सेतू मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गाने बेलापूर, वाशीमार्ग पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. तसंच, जुना मुंबई-पुणे हायवे, कोकणातून येणाऱ्या वाहनांना तसेच पनवेलकडून येणाऱ्या वाहनांनादेखील गव्हाण फाटा उरणफाटा वाशीमार्गे पुढे इच्छित जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जेएनपीटीकडून मुंबईसाठी जाणाऱ्या हलक्या वाहनांना गव्हाण फाटामार्गे उलवे आम्रमार्गे वाशी खाडी पूलमार्गे मुंबईकडे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेतून पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील तसंच, मॅरेथॉनमधील वाहनांना वगळण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.