
गोव्यात कोट्यवधींची उलाढाल करणारा कॅसिनो असलेल्या डेल्टा कॉर्पोरेशनला बंगळूर जीएसटी आयुक्तांनी ११,१३९.६१ कोटी रुपयांची पहिली थकबाकीची नोटीस बजावली आहे. या कंपनीची एकूण थकबाकी १६,८२२ कोटी रुपये (Arrears Notice) इतकी आहे.
दुसरी ५,६८२ कोटी नोटीस रुपयांची नोटीस या कंपनीच्या ३ उपकंपन्यांना बजावण्यात आली आहे. कॅसिनो डेल्टिन डेन्झॉन्ग, हायस्ट्रीट क्रूझ आणि डेल्टा प्लेजर क्रूझ अशी त्या ३ कंपन्यांची नावे आहेत. या तीन कंपन्यांपैकी डेल्टा प्लेजर क्रूझ ही कंपनी गोव्यातील पर्वरी येथे आहे. या कंपनीचा मांडवी येथे ऑफशोर कॅसिनो आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतची जीएसटी थकबाकीची ही रक्कम आहे.
(हेही वाचा – Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवने कॅमेरून ग्रीनला लगावलेले ४ षटकार पाहिलेत का?)
रक्कम फेडली नाही तर …
कंपनीकडून ही थकबाकीची रक्कम फेडली गेली नाही , तर कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. कंपनीने याची कबुली आपल्या वार्षिक अहवालातही दिली आहे. डेल्टा कॉर्पने आपल्या बचावासाठी जीएसटी संचालनालयाने लादलेली जीएसटी आणि नोटीस ही मनमानी आहे, असे म्हटले आहे. कर आणि बजावण्यात आलेली नोटीस दोन्हीही बेकायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. नोटिसीच्या कायदेशीर वैधतेला आव्हान देण्याचे पर्यायही उपलब्ध आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.