राममंदिराचा संघर्ष गेली अनेक शतके चालू आहे. (Siyaram Gupta Rammandir) आता हिंदूंचे ते स्वप्न साकार होत असतांना अनेक भाविक आपापल्या परीने दान-धर्म करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका भाविकाने राममंदिरासाठी अर्पण करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. (ayodhya pran pratishtha)
उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) सियाराम गुप्ता (Siyaram Gupta) हे ते रामभक्त आहेत. त्यांचे नावच सियाराम आहे ! त्यांनी रामजन्मभूमीचा निकाल येण्याआधीच रामभक्ती दर्शवली आहे. 20 नोव्हेंबर 2018 रोजीच सियाराम यांनी स्वतःची 4 एकर जमीन विकली, नातेवाईकांकडून 15 लाख रुपये उसने घेतले. (ram mandir ayodhya)
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शनपूजा २० जानेवारीपासून बंद ; जय्यत तयारी सुरू)
१६ बिघे जमीन विकली
श्रीराममंदिरासाठी 1 कोटी रुपये देणगी उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangha) काशी प्रांताला दिली. श्रीरामजन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या (Shri Ram Janmabhoomi Mandir Trust) नोंदींनुसार ते पहिले देणगीदार आहेत. न्यासाने त्यांना रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी (Pranpratistha ceremony) निमंत्रण दिले आहे. श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची देणगी देणार असल्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी आपली १६ बिघे जमीन विकली होती. पुरेसे पैसे न जमल्याने त्यांनी नातेवाइकांकडून १५ लाख रुपये उसने घेतले. त्यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी १ कोटी रुपये दान केले.
प्रतापगडमध्ये बांधले मंदिर
२२ जानेवारी रोजी श्रीराममंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. या सोहळ्यासाठी सियाराम गुप्ता (Siyaram Gupta) यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सियाराम गुप्ता (Siyaram Gupta) हे श्रीरामाचे निस्सीम भक्त आहेत. प्रतापगडमधील प्रयागराज रोडवर त्यांनी रामाचे एक मंदिरही उभारले आहे.
(हेही वाचा – Ayodhya: राम मंदिराच्या १४ दरवाजांना सुवर्णझळाळी, पुणेकर करणार शंखनाद; कशी सुरू आहे तयारी? वाचा सविस्तर…)
ट्रस्टने घेतली त्यागाची दखल
रामजन्मभूमीचा (Ram Janmabhoomi) निकाल ९ नोव्हेंबर २०१९ रोजी आला. यानंतर सियाराम गुप्ता हे देणगीबाबत विसरूनही गेले. त्यांनी केलेल्या या त्यागाची प्रसिद्धीही केली नाही. देणगीचा प्रचार करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले. आता रामजन्मभूमी ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Mandir Trust) त्यांच्या त्यागाची दखल घेतली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community