मुंबईत धावणार सौर ऊर्जेवर धावणारी एसी लोकल, पश्चिम रेल्वेची माहिती

117

एसी लोकलला मिळणारा वाढता प्रतिसाद बघता पश्चिम रेल्वेकडून एसी लोकलच्या फे-या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सौर ऊर्जेवर चालणारी एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येता आहे. 1 ऑक्टोबरला एसी लोकलमधील एका डब्यात प्रायोगिक तत्वावर सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत. त्यानंतर हळूहळू संपूर्ण मुंबईत सौर ऊर्जेवर धावणारी एसी लोकल दिसेल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काय आहे वैशिष्ट्य?

मुंबईत शनिवारी सौर पॅनेलसह विजेचे दिवे आणि पंखे असलेली पहिली एसी लोकल ट्रेन धावेल, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सेमी-हाय-स्पीड ट्रेन 18 च्या धर्तीवर तयार करण्यात आलेली ही एसी लोकल खास डिझाइन केलेली हाय-पॉवर ट्रेन आहे. यामध्ये अंडरस्लंग मोटर सेटअप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अंडरस्लंग मोटर सेटअपमध्ये ट्रेनमधील ट्रॅक्शन उपकरणे ट्रेनच्या खाली, चाकांजवळ हलवली जातात. त्यामुळे या ट्रेनमध्ये अधिकचे प्रवासी क्षेत्र निर्माण झाले आहे.

(हेही वाचाः 67 पॉर्न वेबसाईट्स होणार ब्लॉक, केंद्र सरकारची मोठी कारवाई)

3.6 किलोवॅट वीज मिळणार

वजनाने हलके असणा-या फ्लेक्सी सोलर पॅनलचा या नवीन एसी लोकलमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सोलर पॅनलमध्ये 3.6 किलोवॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे. या वीजेच्या माध्यमातून एसी लोकलमधील पंखे आणि दिवे चालू होतील. त्याचप्रमाणे लोकल धावण्यासाठी लागणारी ओव्हरहेड वीज देखील या पॅनलच्या माध्यमातून पुरवली जाणार आहे. सध्या ट्रेनच्या एका डब्यामध्ये हा प्रयोग करण्यात येणार असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा विस्तार करण्यात येईल, असे रेल्वेच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.