येत्या जूनमध्ये पहिलीत जाणा-या लाखो वि्दयार्थ्यांना आता नवीन पाठ्यपुस्तक देण्यात येणार आहे. मुलांना देण्यात येणारे हे पाठ्यपुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार आहे. लहान मुलांमध्ये वय वर्षे आठपर्यंत एकावेळी अनेक भाषा शिकण्याची क्षमता असते. हीच क्षमता लक्षात घेऊन, पहिलीच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात दोन भाषा देण्यात येणार आहेत. यामागे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा उद्देश आहे.
प्रायोगिक तत्त्वावर पाठ्यपुस्तक
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (म्हणजेच बालभारती) ‘सृजन बालभारती’ या एकात्मिक पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली आहे. हे पाठ्यपुस्तक २०२०-२१ मध्ये राज्यातील ६६ तालुक्यांमधील शाळांना प्रायोगिक तत्त्वावर दिले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या ५ मार्च २०२१ च्या निर्णयानुसार राज्यातील ४८८ आदर्श शाळांपैकी ३८० ते ३८८ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एकात्मिक द्विभाषिक अशा नव्या पाठ्यपुस्तकाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
( हेही वाचा: मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर : बुधवारच्या बैठकीकडे लक्ष )
दप्तराचे ओझे होणार कमी
१० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाची सुरवात या नव्या पाठ्यपुस्तकाने होणार असून, त्यादृष्टीने नियोजन सुरू असले, तरी त्याबाबत शासनाच्या अधिकृत आदेशाच्या प्रतीक्षेत बालभारती आहे. सृजन बालभारती या पाठ्यपुस्तकाचे चार भाग असून, प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. मी आणि माझे कुटुंब, पाणी, प्राणी, वाहतूक व आपले मदतनीस या विशिष्ट विषयाशी संबंधित आहे. एकाच पुस्तकात अनेक गोष्टी असल्याने, आता विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
Join Our WhatsApp Community