पुण्यातील जीबीएसबाधित एका तरुणाचा सोलापूरमध्ये शनिवारी 25 जानेवारी रोजी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला GBS (Guillain-Barre Syndrome) याची लागण झाली होती. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाला आहे. (GBS)
मूळचा सोलापूर (Solapur GBS Death) जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात GBS या आजाराची लागण झाली होती. GBS (Guillain-Barre Syndrome) मुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. हा तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता. परंतु श्वासनाचा त्रास झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पुण्यात रविवारी 26 जानेवारी रोजी 68 पुरुष आणि 33 महिलांना GBS लागण झाली असून आता ही संख्या 101 वर पोहोचली आहे. यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
(हेही वाचा – Virat Kohli : रणजी सामन्यापूर्वी विराट कोहलीचा मुंबईत संजय बांगरबरोबर सराव)
अजित पवार म्हणाले…
पुण्यातून आलेल्या रुग्णाचा सोलापुरात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुण्यातील दोन रुग्णालयात सदर जीबीएस वायरस संदर्भात उपचार सुरू करण्यात आले आहेत तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या नमुन्याबाबत सूचना दिल्या आहेत, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) आणि पुणे महानगरपालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाने शहरातील एकूण 25,578 घरांचे सर्वेक्षण केले असून त्यात PMC हद्दीतील 15,761, चिंचवड MC हद्दीतील 3,719 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 6,098 घरांचा समावेश आहे.
काय काळजी घ्यावी
- पाणी उकळून व गाळून प्यावे.
- उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
- अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
(हेही वाचा – London मध्ये खलिस्तानी समर्थक आणि भारतीय आले समोरासमोर; भारतीयांनी दिले चोख प्रत्युत्तर, Video viral)
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात. काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते. याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community