१४ ऑगस्टपर्यंत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून दिनांक १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६० कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. तसेच या कालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा : Mahrashtra Tourism : मुंबई-पुण्यातील मानाच्या बाप्पांचे दर्शन! आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही; असे करा बुकिंग)

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

तसेच या पार्श्वभूमीवर किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावेत. जिल्हा नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास त्वरीत द्यावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, रत्नागिरीत रविवारी आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here