राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी! काय आहे कारण?

132

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने १५ ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुट्टीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुट्टी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर १७ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्ष नेते अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक जण उपस्थित राहणार आहेत.

( हेही वाचा : दिल्लीत घडले आणखी एक श्रद्धा वालकरसारखे हत्याकांड  )

राज्यातील शाळांना लागोपाठ पाच दिवसांची सुट्टी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वात मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखाहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा यावेळी बंद राहणार आहेत. राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व १९ फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुट्टी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.