मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार; Jaykumar Gore यांची घोषणा

29
मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार; Jaykumar Gore यांची घोषणा

वीर पुरुषांचे कार्य युवा पिढी समोर येणे महत्त्वाचे आहे. यासाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून पाच कोटींचा निधी तातडीने दिला जाईल, अशी घोषणा ग्रामविकास व पंचायराज मंत्री गोरे (Jaykumar Gore) यांनी कार्यक्रमाप्रसंगी केली.

(हेही वाचा – NCB कडून 88 कोटी रुपयांच्या मेथमॅफेटाईन गोळ्यांचा मोठा साठा जप्त; चौघांना अटक)

ते पुढे म्हणाले, मुरूम गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव तातडीने सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. या माध्यमातून मुरूम व परिसराचा चांगला विकास केला जाईल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचेही जतन केले असल्याचेही मंत्री गोरे (Jaykumar Gore) यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

(हेही वाचा – लेक्स फ्रिडमॅनसोबतच्या पॉडकास्टमध्ये PM Narendra Modi यांनी RSS विषयी व्यक्त केली कृतज्ञता; म्हणाले, ‘संघाने मला संस्कार आणि आयुष्याला दिशा दिली’)

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी आमदार फंडातून भरीव निधी दिला जाईल, असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास स्वरूपराजे खर्डेकर, धैर्यशील कदम, माणिकराव सोनवलकर, लक्ष्मण हाके यांच्यासह मुरूम इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Jaykumar Gore)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.