मुंबईत पाच महिन्यांच्या बाळाचा गोवरमुळे मृत्यू

120

मुंबईतील वडाळा येथे गोवरचा १५ वा बळी गेला. वडाळ्यात ५ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्राने गोवरचे वाढते रुग्ण पाहता गोवरची प्रतिबंधात्मक लस ६ महिन्यांपासून देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. मात्र ५ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने आता पालिका आरोग्य विभागही हवालदील झाला आहे.

नेमके काय झाले

११ नोव्हेंबरपासून बाळाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवू लागला. बारा दिवसांनी बाळाला ताप आला. दुस-या दिवशी बाळाच्या छातीवर आणि चेह-यावर पुरळ आले. पालकांनी दोन दिवसांनी पालिका रुग्णालयात दाखल केले त्यावेळी बाळाला डोळेही आले. २७ नोव्हेंबरपासून बाळाला श्वासही घेता येईना. अखेर सोमवारी तब्येत गंभीर होत बाळाचा दुपारी ४ वाजता ४५ मिनिटांनी मृत्यू झाला. गोवर आणि छातीत न्यूमोनिया झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

  • मुंबईतील गोवरबाधितांची संख्या – ३०८
  • मृत्यूची संख्या – १५, निश्चित मृत्यूची संख्या – ८ , संशयित मृत्यूची संख्या – ४, मुंबईबाहेरील मृत्यू – ३
  • व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या – २
  • मंगळवारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या – ४३
  • डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – २९
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.