मुंबईत गोवरची संख्या नियंत्रणात येत असल्याचा दावा पालिका अधिका-यांकडून केला जात असताना गोवंडीत अजून एका बाळाचा गोवरमुळे मृत्यू झाल्याचे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या बाळाचा मृत्यू १३ डिसेंबरला झाला होता. प्रयोगशाळा अहवालातून या बाळाचा मृत्यू गोवरमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. गोवंडी हा गोवरच्या साथीचा मुंबईभरातून हॉटस्पॉट झाला असताना, आता गोवंडीत साथ आटोक्यात येत असून, कुर्ला येथील गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे.
बाळाच्या आजारपणाबद्दल –
११ डिसेंबरपासून पाच महिन्यांच्या बाळाला ताप आणि पूरळ येत असल्याचे दिसून आले. बाळाला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. दुस-या दिवशी बाळाला श्वास घ्यायला त्रास जास्तच जाणवू लागल्याने, पालकांनी त्याला पालिका रुग्णालयात दाखल केले. पालिका रुग्णालयात बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. १३ तारखेला बाळाची तब्येत अजूनच खालावत गेली. अखेरिस बाळाचा उपचारादम्यान मृत्यू झाला. मुंबईत ९ बालकांनी आतापर्यंत गोवरमुळे आपला जीव गमावल्याची नोंद पालिका आरोग्यविभागाकडून झाली. गोवरची लागण झाल्याने अजून ५ बालकांचा मृत्यू झाला आहे. परंतु मृत्यू छाननी समितीकडून या बालकांच्या मृत्यूबाबत माहिती येणे बाकी आहे.
( हेही वाचा: झोपताना तुमचा मुलगा SmartPhone पाहतो? )
Join Our WhatsApp Community