ब्रिटनमध्ये सापडले ५ हजार वर्षांचे मंदिर

नॉर्थम्प्टनच्या उत्तरेस सुमारे चार मैलांवर असलेल्या ओव्हरस्टोन या गावात नवीन निवासस्थान बांधण्यासाठी टीमचे खोदकाम सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, या ठिकाणी २ हजार वर्षांहून अधिक काळ लोकांचे वास्तव्य होते. प्राचीन उत्पत्तीच्या अहवालानुसार, कांस्य युग आणि रोमन संस्कृतीतील अनेक कलाकृती या ठिकाणी सापडल्या आहेत. हे मंदिर एका पवित्र ठिकाणी बांधण्यात आले आहे. यामध्ये दोन स्वतंत्र खोल्या आहेत, त्यापैकी एक खोलीमध्ये शिड्या आहेत. भिंतींवर अनेक चित्र आहेत.

इराकमध्येही ४,५०० वर्षांपूर्वीचे मंदिर सापडले 

तज्ज्ञांनी इथे ५ कांस्ययुगीन गाडलेले कलश सापडले आहेत. या ठिकाणी कोणतीही कबर किंवा मानवी अवशेष सापडलेले नाहीत. मात्र १,५०० ते २,००० ख्रिस्तापूर्वी काळा दरम्यान बांधण्यात आलेली दफनभूमी सापडली आहे. तज्ज्ञांना एक मोठी पाण्याची टाकी सापडली आहे. त्या टाकीच्या तळाशी विलो या झाडाची फुले, पाइनकोन, तसेच अक्रोडची कवचे सापडली आहेत. त्याबरोबरच २,००० वर्ष जुन्या सेंद्रिय अवशेषांपासून बनविण्यात आलेले चामड्याचे बूट देखील सापडले आहेत. तज्ज्ञांच्या मते स्थानिक प्राचीन समुदायांसाठी हे एक महत्वाचे ठिकाण असावे. पुरात्वतशास्त्रज्ञांना या जागेमध्ये इसवीसन ४३ ते ४१० मधील रोमन संरचनेचे अवशेष देखील सापडले आहेत. संशोधकांच्या मते, या संरचनेचा कोणताही कार्यात्मक हेतू नसावा. कारण रोमन लोकांनी अशा अनेक पवित्र स्थळांवर मंदिरे बांधलेली आजही पाहायला मिळतात. अलीकडेच, इराकमधील संशोधकांना जमिनीत गाडलेले ४,५०० वर्षे जुने मंदिर सापडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here